kavita - shailaja shewade

Monday, October 23, 2006

अबोल्यात तुझ्या वाटे,
सारे काही फोल,
काहीतरी बोल राजा,
काहीतरी बोल,
प्रेमात नाहीतर रागात,
प्रीती माझी तोल,
काहीतरी बोल राजा
काहीतरी बोल
किती मिटून घेतलयसं
स्वतःतच स्वतःला,
मनात तुझ्या शिरायला
कुठून वाव मला,
तुझ्याभोवती फिरतात
विचार माझे गोल,
काहीतरी बोल राजा,काहीतरी बोल
तुझ्या बन्द दाराशी,
केव्हाची मी उभी,
किती ठोठावू दार,
माहित नाही खुबी,
उनपाऊस ताडतय
मला किती सावरू तोल,
काहीतरी बोल राजा,
काहीतरी बोल।

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home