kavita 1
आषाढी घन गरजत होते,
सूर तुझे ते बरसत होते,
माझ्या नकळत गालावरती,
अश्रू माझे झरतच होते...!
धडाडधुडुम वारा होता,
अन्धारुनही आले होते,
'यमनाच्या'त्या सुरावटीवर,
जलधारान्चे नर्तन होते....!
अनादी नाद भरला होता,
डोळे तुझे मिटले होते,
निरोप तुझा घेऊ कसा मी,
माझे मीपण नुरले होते...!
कडाडकड अन वीज चमकली,
क्षणात कळले अपुले नाते,
जन्मजन्मीचा क्रुष्णसखा तू,
स्वरवेडी मी गवळण होते...!
सूर तुझे ते बरसत होते,
माझ्या नकळत गालावरती,
अश्रू माझे झरतच होते...!
धडाडधुडुम वारा होता,
अन्धारुनही आले होते,
'यमनाच्या'त्या सुरावटीवर,
जलधारान्चे नर्तन होते....!
अनादी नाद भरला होता,
डोळे तुझे मिटले होते,
निरोप तुझा घेऊ कसा मी,
माझे मीपण नुरले होते...!
कडाडकड अन वीज चमकली,
क्षणात कळले अपुले नाते,
जन्मजन्मीचा क्रुष्णसखा तू,
स्वरवेडी मी गवळण होते...!
शैलजा शेवडे
3 Comments:
At 6:15 PM,
Milind Phanse said…
कविता छान, अन चित्रमय आहे. "धडाडधुडुम" जरा खटकतय. "अनादी नाद भरला होता" ऐवजी "नाद अनादी भरला होता" केले तर अधिक लयीत होईल. शुभेच्छा.
At 11:38 AM,
डॊ.मुक्ता पाठक शर्मा said…
जन्मजन्मीचा क्रुष्णसखा तू,
स्वरवेडी मी गवळण होते...!
या ओळी अप्रतिमच!
At 8:56 AM,
CA Pandurang Lokhande said…
जन्मो.. पंक्ती आवडल्या
Post a Comment
<< Home